त्रिपुरा हिंसाचार घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. त्रिपुरा येथील धार्मिक स्थळावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुसलमान संघटनांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यामुळे अमरावतीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून संचारबंदीमध्ये पोलीस प्रशासनाकडून शिथिलता मिळाली होती. मात्र आता पुन्हा अमरावतीमध्ये कडक संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत.
अमरावतीमधील जिल्हा प्रशासनाला भाजप, वंचितांच्या आंदोलनाची धास्ती आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये पुन्हा कडक संचारबंदीचे आदेश पोलीस प्रशासनाने दिले आहेत. अमरावतीमध्ये सकाळी ९ ते सायंकाळी ६पर्यंत कडक संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. तसेच ५ पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. यासंबंधीचे सुधारित आदेश पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी दिले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.