उन्हाची सुरुवात झाली अन् उन्हाच्या झळा बसायला लागल्या आहेत. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाच्या झाला बसायला सुरुवात झाली आहे. उन्हात फिरताना डोक्यावर टोपी आणि डोळ्यावर गॉगल हे गरजेचं बनलं आहे. त्यासाठी,अनेकजण रस्त्यावरील गॉगल खरेदी करतात. बरेच लोक उन्हाळ्यात डोळ्यासाठी गोगलचा वापर करतात. तसेच उन्हाळ्यात बाहेर फिरत असताना डोळे लाल होतात, जळजळ करतात अथवा डोळ्यांमध्ये कचरा जाण्याचीही शक्यता असते. नेत्र तज्ञ सल्ला देतात कि, रस्त्यावरील गॉगलमध्ये किती प्रमाणात किती अंश प्रमाणात आपल्याला आराम पडू शकतो की नाही. याची निश्चितपणे प्रत्येकानी खात्री करून घ्यावी.
गॉगलमध्ये बरेच वेळा असे घटक असतात की जे प्लास्टिक स्वरूप असतात.कारण की ते काच नसतात. प्लास्टिक असल्यामुळे आर्थिक बाजूही थोड्या प्रमाणामध्ये सावरले जाते आणि प्रत्येकाला तो गॉगल कमी किमतीमध्ये असल्यामुळे घ्यावासा वाटतो. प्लास्टिक ग्लास वापरल्यामुळे खूप प्रमाणामध्ये डोळ्यांवरती विपरीत परिणाम होऊ शकतात असे नेत्र तज्ञ यांनी सांगितले. मात्र यावर रोडच्या कडेला लागलेल्या दुकानदार यांना विचारणा केली असता त्यांनी आपले गॉगल हे चांगल्या दर्जाचे असल्याचे तसेच ग्राहक आता उन्हाळ्यात मात्र हे गॉगल मोठ्या प्रमाणात खरेदी करत असल्याचा सुद्धा या दुकानदारांनी सांगितले. कमी किमतीत आणि दिसायला हि चांगले वाटणारे गॉगलस आपल्या डोळ्यांसाठी किती प्रमाणात चांगले आहे हे प्रत्येक ग्राहकांने बघितले पाहिजे. कारण डोळे हे आपल्या आयुष्यातील खूप महत्वाचा घटक आहे त्याने आपल्या डोळ्यांना काही इजा होणार नाही याची काळजी आपणच घेतली पाहिजे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.