सावधान: पूर्व-विदर्भात पावसाचा जोर वाढणार – हवामान खाते

सावधान: पूर्व-विदर्भात पावसाचा जोर वाढणार – हवामान खाते

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

पूर्व-विदर्भात २७ आणि २८ ऑगस्ट रोजी पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पूर्व-भारतात तयार झालेल्या एका कमी दाबाच्या पट्टा तयार झाल्याने ही शक्यता वर्तवली जात आहे.

मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे हवामान खात्याने नागरिक आणि शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनी या हवामानाच्या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे असे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

यामुळे या दरम्यान गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

पावसाच्या या स्थितीमुळे नदी-नाल्यांना पूर येण्यासारखी स्थिती उद्भवू शकते ज्यामुळे काही गावांचा संपर्क देखील तुटू शकतो. म्हणूनच नदी-नाल्यांच्या काठी राहणाऱ्या लोकांनी सावध राहावे.

या दरम्यान नागपूर, वर्धा, अमरावती, नांदेड, हिंगोली आणि वाशीम जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर उर्वरित विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात हलक्या पावसाची शक्यता असणार आहे.

राज्यातल्या इतर भागातील हवामानात विशेष बदल होणार नाही. २८ ऑगस्ट नंतर पुढचे काही दिवस राज्यात पुन्हा पाऊस कमी होणार असल्याचे मत हवामान तज्ज्ञांनी वर्तविले आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version