‘लोकांना मुर्ख बनवणे थांबवा’; किरीट सोमय्यांची अजित पवारांवर टीका

‘लोकांना मुर्ख बनवणे थांबवा’; किरीट सोमय्यांची अजित पवारांवर टीका

  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संपत्ती जप्त करण्याची नोटीस आयकर विभागाने दिली आहे. मात्र अजित पवारांच्या  कोणत्याही मालमत्तेवर आयकर विभागाने कारवाई केली नसल्याचे अजित पवारांच्या वकिलांनी सांगितले आहे. यावर भाजप नेते किरीट सोमय्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

 किरिट सोमय्या यांनी ट्विट केले की, अजित पवार लोकांना मूर्ख बनवणे थांबवा. तुमच्या कौटुंबिक मित्रांच्या कंपन्या हजार कोटींहून अधिक बेनामी आणि नामी साम्राज्य ८ हून अधिक शहरांमध्ये पसरले आहेत. स्पार्कलिंग सॉइल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तुम्ही स्थापन केली आहे. त्यासाठी १३ वर्षांपूर्वी १०० कोटी रुपये मिळाले होते, ते परत आले की नाही? असा सवाल किरिट सोमय्यांनी उपस्थित केला आहे.

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वकील ॲड प्रशांत पाटील म्हणाले, अजित पवार यांच्या संबंधित संपत्तीवर टाच आलेली नाही तसेत त्यासंबंधी त्यांना कोणतीही नोटीसही बजावण्यात आली नाही. प्राप्तिकर विभागाकडून काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. त्या पत्राला योग्य ते उत्तर देण्यात येईल. तसचे योग्य ती कार्यवाही केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version