विरोधकांकडून शिंदे गटाविरोधात गद्दार दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता पोलिसांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना नोटीसा बजावल्या आहे. ठाकरेंची शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आज राज्यभरात शिंदे गटाविरोधात गद्दार दिन साजरा केला जात आहे.
शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध करण्यासाठी मविआचे नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. परंतु आता गद्दार दिन साजरा करण्यावर आज मुंबई पोलिसांकडून प्रतिबंध घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ठाकरे गटाच्या नेत्यांना पोलिसांनी नोटीसा जारी करत गद्दार दिन साजरा करण्यास प्रतिबंध घातला आहे. त्यामुळं आता यावरून सत्ताधारी भाजप-शिंदे गट आणि मविआच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे. शिंदे-फडणवीस सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे, त्यानिमित्त महाविकास आघाडीकडून राज्यभरात गद्दार दिन साजरा करण्यात येणार आहे. विरोधकांकडून शिंदे गटाविरोधात गद्दार दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता पोलिसांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना नोटीसा बजावल्या आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.