चालत्या गाडीवर दगड भिरकावणाऱ्यांची आता खैर नाही

चालत्या गाडीवर दगड भिरकावणाऱ्यांची आता खैर नाही

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

उपनगरीय आणि लांब पल्ल्यांच्या चालत्या गाडीवर दगड भिरकावण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही महिन्यांत वाढ झाली आहे. याची गंभीर नोंद रेल्वे प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे यापुढे धावत्या रेल्वेवर दगड मारल्यामुळे प्रवासी, लोको पायलट, मोटरमन किंवा सुरक्षारक्षक जखमी झाल्यास दगड मारणाऱ्याला रेल्वे नियमानुसार जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.

 

त्यामुळे दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवले जाणार आहेत. झोपडय़ांमधून किंवा लोहमार्गाच्या बाजूला वावर असलेले समाजकंटक धावत्या रेल्वेवर दगड भिरकावतात. मागील काही महिन्यांमध्ये असे अनेक प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

 

त्यामुळे प्रवासी, मोटरमन, सुरक्षारक्षक किंवा लांबपल्ल्याच्या गाडय़ांमधील लोको पायलट जखमी होण्याचे प्रकार घडले आहेत. जानेवारी 2017 ते मे 2017 या कालावधीत पश्चिम रेल्वेमार्गावर धावत्या लोकलवर दगडफेकीचे 34 प्रकार घडले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version