कबुतरांचा वावर तुमच्या नजीक होतोय? काळजी घ्या

कबुतरांचा वावर तुमच्या नजीक होतोय? काळजी घ्या

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

कबुतरांना उघड्यावर खायला घालू नये अशा सूचना पुणे महापालिकेने दिल्या आहेत. त्याबद्दलचा कायदाच करण्यात यावा अशी मागणीही महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये करण्यात आली. कबुतरांच्या पिसांसह विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या जंतूमुळे हायपर सेन्सिटिव्ह न्यूमोनिया हा आजार बळावण्याचे पुण्यासह मुंबईत प्रमाण वाढत असून, त्यामुळे काही जणांवर फुफ्फुस प्रत्यारोपण करण्याची वेळ आल्याची धक्कादायक माहिती समोर येते.

म्हणूनच, सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खायला टाकायला बंदी घालावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. कबुतरांमुळे हायपर सेन्सेटिव्ह न्यूमोनिया, दमा असे फुफ्फुसांशी संबंधित आजार होण्यास हे पारवे कारणीभूत ठरत आहेत. रुग्णाचं फुफ्फुस आकुंचन पावणं, बोलताना दम लागणं अशा तक्रारींमध्ये वाढ झाल्याचे आणि कित्येकदा तर शस्त्रक्रिया करण्याची वेळ येत असल्याचं डॉक्टरांचे म्हणणे आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version