मुंबई, २ मे २०२३, प्रतिनिधी : सध्या सुरु असलेल्या राजकीय वर्तुळात अजित पवार भाजपात जाणार अशा चर्चा गेले बरेच दिवस रंगल्या असून आता ‘काही दिवसात अजित पवार हे भाजपात येणार’ असल्याचं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. परंतु या चर्चा केवळ चर्चा आहेत. यामध्ये कोणतेही तथ्य नाही. आपल्या जीवात जीव असेपर्यंत आपण राष्ट्रवादी पक्ष सोडणार नसल्याचं अजित पवार यांनी सांगून या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र काल झालेल्या वज्रमूठ सभेनंतर प्रतिक्रिया देताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी काही दिवसात अजित पवार हे भाजपात येणार असल्याचा दावा केल्याने राजकीय क्षेत्रात पुन्हा एकदा चर्चा होणार असल्याचे एकंदरीत चित्र दिसत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.