राज्य उत्पादन विभागाने समीर वानखेडेंना बजावली नोटीस

राज्य उत्पादन विभागाने समीर वानखेडेंना बजावली नोटीस

राज्य उत्पादन विभागाने एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना नोटीस बजावली आहे. समीर वानखेडे यांच्या नवी मुंबईतील बारला परवानाप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, त्यामुळे आता समीर वानखेडे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

समीर वानखेडे यांना राज्य उत्पादन विभागाने याप्रकरणी महिन्याभराची मुदत दिली आहे. तसेच महिन्याभरात उत्तर न दिल्यास परवाना रद्द केला जाणार असल्याचा इशारा राज्य उत्पादन विभागाने दिला आहे.

समीर वानखेडे यांना १९९७मध्ये बार परवाना देण्यात आला. मात्र त्यावेळी समीर वानखेडे यांनी १९९७मध्ये केलेल्या बार परवानासाठी केलेल्या अर्जात वयाबद्दल चूकीची माहिती दिली होती. त्यावेळी समीर वानखेडे यांचे वय १७ वर्षे होते तर बार परवाना मिळण्यासाठी किमान वय २१ असावे लागते, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने सांगितले आहे.

क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. तसेच वानखेडे कुटुंबावरही ट्विटरच्या माध्यमातून अनेक आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे वानखेडे कुटुंबियांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अशातच आता राज्य उत्पादन विभागाने समीर वानखेडे यांना बार परवानाप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावल्यामुळे समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. तसेच समीर वानखेडे यांना याप्रकरणी महिन्याभराची मुदत दिली आहे. या महिन्याभरात उत्तर न दिल्यास वानखेडे यांचा परवाना रद्द केला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने सांगितले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version