एसटी कर्मचारी सोमवारी कामावर हजर न झाल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला होता. मात्र काल रात्रीपर्यंत कर्मचाऱ्यांच्या कारवाईबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच कर्मचारी मंगळवारीसुद्धा आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत.
मोर्चेकरी कर्मचाऱ्यांची पगार वाढ केल्यानंतर परिवहन मंत्र्यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर ९० हजार कर्मचाऱ्यांपैकी तीस हजार कर्मचाऱ्यांनी या आवाहनाला प्रतिसाद देत कामावर परतले. काही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झालेली आहे. तर आता आंदोलनावर ठाम असलेल्या कर्मचाऱ्यांवकर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
राज्य सरकार सोमवारपर्यंत एसटी कर्मचारी कामावर रूजू होण्याची वाट पाहणार होते. तसेच सोमवारपर्यंत कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णयही अनिल परबांनी घेतला आहे. तसेच कर्मचाऱ्यांना वाढीव पगारवाढ देण्यात येईल. मात्र सोमवारपर्यंत कर्मचारी कामावर परतले नाही तर कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येण्याचा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला होता. तरीही आज मंगळवारी कर्मचारी आंदोलन करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.