एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत उच्च न्यायालयाने संपकारी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत सेवेत रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन, ग्रॅच्युएटी देण्याचे आदेशही एसटी महामंडळाला दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा तिढा सुटला आहे. दरम्यान, बुलडाण्यातील कर्मचाऱ्यांचा संप संपुष्टात आला असून कर्मचाऱ्यांनी लवकरच कामावर रुजू होण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
एसटी संपाबाबत उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांचा संप संपणार असल्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून एसटी महामंडळ राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपावर गेले होते. मात्र, आता एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर २२ एप्रिलपर्यंत रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला आहे. ढोल-ताशाच्या गजरात, गुलाल उधळून एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी आनंद साजरा केला आहे.
मागील पाच महिन्यांपासून राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर सुनावणी झाली. मुंबई उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्यास सांगितले आहे. तसेच कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन, ग्रॅच्युएटीचा लाभ देण्याबाबत आदेश देण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. संपकारी कर्मचारी सेवेत रुजू होताना कर्मचाऱ्यांनी पुन्हा असे होणार नाही, अशी समज देत सेवेत रुजू करण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने एसटी महामंडळाला दिले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.