राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरूच

राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरूच

राज्यातील एसटी महामंडळ राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. विलिनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी ठाम असून त्यांनी कामबंद आंदोलन सुरूच ठेवले. राज्यात ठिकठिकाणी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असून मुंबईतील आझाद मैदानात गेल्या महिनाभर कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन पुकारले असल्यामुळे आंदोलन मागे घेण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. तसेच विलिनीकरणाची मागणी पूर्ण होईपर्यंत राज्य सरकारने कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र तरिही कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. तसेच कर्मचारी पुन्हा कामावर रूजू झाले नाहीत तर कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे.

कामावर पुन्हा रुजू न झाल्यामुळे राज्य सरकारने कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे तसेच अनेक कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती केली आहे. तसेच सेवासमाप्ती केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू करून घेणार नसल्याचेही राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

गेले महिनाभर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे जिल्ह्यातील एसटीसेवा बंद झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नोकरदार, विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल होत आहे. प्रवास करण्यासाठी प्रवाशांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत.

कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले नाही तर कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचा इशाराही राज्य सरकारने दिला आहे. तसेच अनेक संपकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून अनेकांवर सेवा समाप्तीची कारवाईही राज्य सरकारने केली आहे. तरिही अद्याप कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version