‘सिल्वर ओक’वर एसटी कर्मचारी आक्रमक

‘सिल्वर ओक’वर एसटी कर्मचारी आक्रमक

राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांची विलिनीकरणाची मागणी अमान्य केल्यामुळे एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. आज संपकारी कर्मचाऱ्यांनी थेट राष्ट्रवादीच काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवसास्थानी धडक मोर्चा काढला आहे. यावेळी संपकारी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या विरोधात घोषणा केली. या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपकारी कर्मचारी थेट शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवास्थानी धडकले आहेत. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. मात्र, संपकारी कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत सेवेत रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांना निवृत्तवेतन आणि ग्रॅच्युएटी देण्याचे आदेशही एसटी महामंडळाला दिले आहेत. त्यामुळे राज्यात एकीकडे संप संपुष्टात आल्याची घोषणा करण्यात येत आहे तर दुसरीकडे कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे आज संपकारी कर्मचारी शरद पवार यांच्या निवासस्थानी धडकले आहेत. यावेळी कर्मचाऱ्यांनी पवारांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version