Chhatrapati Sambhajinagar Accidend : ब्रेक फेल झाला अन् चालकाचे नियंत्रण सुटले…, एसटी महामंडळाच्या हिरकणी बसचा अपघात

भुसावळ-छत्रपती संभाजीनगर या एसटी महामंडळाच्या हिरकणी बसचा आज अपघात झाला. छत्रपती संभाजीनगर शहराजवळील हर्सूल-सावंगी परिसरात ही घटना घडली.
Chhatrapati Sambhajinagar Accidend : ब्रेक फेल झाला अन् चालकाचे नियंत्रण सुटले…, एसटी महामंडळाच्या हिरकणी बसचा अपघात

भुसावळ-छत्रपती संभाजीनगर या एसटी महामंडळाच्या हिरकणी बसचा आज अपघात झाला. छत्रपती संभाजीनगर शहराजवळील हर्सूल-सावंगी परिसरात ही घटना घडली. बसचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित बस ही जळगाव जिल्ह्यातील जामनेर आगाराची असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा- Indira Gandhi Appealed For Gold : 1967 मध्ये इंदिरा गांधींकडून सोनं खरेदी न करण्याचं आवाहन, व्हायरल फोटोमागील सत्य काय?

धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रजापूर शिवारातील अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद 
तर दुसरीकडे धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रजापूर येथे आज भरधाव वेगाने जाणारा हायवा अचानक पलटल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातावेळी रस्त्यावरून जात असलेला एक दुचाकीस्वार थोडक्यात बचावला असून मोठी दुर्घटना टळली. महामार्गावरील अवैध कट पॉईंटमुळे चालकाचा ताबा सुटून हायवा रस्त्यावर पलटला. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी अवैध कट पॉईंट तयार झाले असून त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. “राष्ट्रीय महामार्ग प्रशासन अजून किती जीव घेणार?” असा सवालही संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version