जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची घोषणा केली आहे. शुक्रवारपासून मागण्या मान्य होईपर्यंत संपावर जाणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना सातवे वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसले आहे. एसटीचे चालक, वाहक तसेच इतर कर्मचारी संपावर गेले तर राज्याची परिवहन सेवा कोलमडेल. या संपाचा प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे.
26 मे रोजी संपासाठी एसटी बसच्या कर्मचाऱ्यांचे मतदान घेण्यात आले होते. त्यात 99.90 टक्के कर्मचाऱ्यांनी संपाच्या बाजूने मतदान केले होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.