ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी संपावर; कामगारांच्या संपाने प्रवाशांचे हाल

ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी संपावर; कामगारांच्या संपाने प्रवाशांचे हाल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

वेतनवाढीच्या मागणीवरून एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संप मध्यरात्रीपासून सुरु झालाय. ऐन सनासुदीत राज्यभर एसटी सेवा बंद झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

विविध एसटी कामगार संघटनांनी या संपाला पाठिंबा दिलाय. दिवाळीत होत असलेल्या या संपाने एसटी प्रशासनाची कोंडी होण्याची शक्यताये. मुंबईतील परळ आगारातून देखील आज एकही एसटी बाहेर पडलेली नाही.

त्यामुळे दिवाळीनिमित्त गावाकडे आणि इतरत्र जाणाऱ्या प्रवाशांना मनस्तापाला सामोरं जावं लागतंय.

या संपामुळे ऐन दिवाळीच्या सुट्टीत गावाला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होतायेत.  मध्यरात्रीपासून डेपोतून एकही गाडी सुटलेली नाही त्यामुळे प्रवासी बस स्टँडवर ताटकळलेयेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version