SSC Paper Leak: दहावी परीक्षेच्या 3 दिवस आधीच गणिताच्या प्रश्नपत्रिका टेलिग्रामच्या ग्रुपवर, अॅडमिनवर गुन्हा दाखल

पुण्यात दहावीचा गणिताचा पेपर टेलिग्रामवर लीक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पुणे बोर्डाने पोलिसांत तक्रार दाखल केली.  असून पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहे. 
SSC Paper Leak: दहावी परीक्षेच्या 3 दिवस आधीच गणिताच्या प्रश्नपत्रिका टेलिग्रामच्या ग्रुपवर, अॅडमिनवर गुन्हा दाखल

दहावी-बारावीच्या परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा, पण याच परीक्षेला आता ‘पेपरफुटीच्या’ वाळवीने पोखरल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त आणि तणावमुक्त वातावरणात पार पडावी म्हणून राज्याच्या शिक्षण मंडळाने शर्थीचे प्रयत्न केलेत.

मात्र त्यानंतर ही वारंवार पेपर फुटत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशातच दहावीचे पेपर सुरु असताना पुण्यात गणित भाग-1 आणि भाग-2 चे पेपर परीक्षा होण्यापूर्वीच तीन दिवस आधीच एका टेलिग्राम ग्रुपवर लीक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. विद्येचे महेर घर असलेल्या पुण्यात हा सर्व प्रकार घडल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पुणे बोर्डाने पोलिसांत तक्रार दाखल केली पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहे. प्रकरणी पुणे विभागीय मंडळाने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून टेलिग्राम ग्रुप अॅडमिन व सदस्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version