नुकताच SSC बोर्डाचा निकाल जाहीर झाला. यामध्ये कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागला. त्याचप्रमाणे मुलींनी नेहमीप्रमाणे बाजी मारली. मात्र असं असलं तरीही एक चिंताजनक बाब समोर आली आहे. राज्याची मातृभाषा असलेल्या मराठी विषयाबाबत चिंताजनक चित्र समोर आलं आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेत प्रथम भाषा म्हणून मराठी घेणाऱ्या तब्बल १० लाख 87 हजार विद्यार्थ्यांपैकी 80 हजारांहून अधिक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. द्वितीय आणि तृतीय भाषा म्हणून मराठी निवडलेल्या विद्यार्थ्यांमधील नापासांची संख्या धरता, मराठी विषयात एकूण 94 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी अपयशी ठरले आहेत. दुसरीकडे संस्कृत आणि गुजरातीसारख्या भाषांचा निकाल अत्यंत उच्च लागल्याने मराठी विषयाकडे विद्यार्थ्यांची वाढती अनास्था पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
त्यामुळे शाळांमध्ये मराठी भाषेसंदर्भात राज्यभरात आता गांभीर्याने तक्ष दिले पाहिजे हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. तसेच मराठी भाषा शिकवण्यावर अधिक जोर देण्यात यावा अशी मागणीदेखील अनेक स्तरातून केली जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.