जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर
हैदराबादहून जबलपूरकडे जाणार्या स्पाईस जेट विमानाच्या कॉकपिटमधून अचानक धूर निघू लागल्याने स्पाईस जेट विमानाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी दुपारी 2.05 इमरजेन्सी लँडिंग करण्यात आले.
विमानाने उड्डाण भरल्यानंतर काहीच वेळातच कॉकपिटमधून धूर येत असल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. हा धूर विमानात हळूहळू पसरू लागला. वैमानिकाने परिस्थिती पाहून विमान नागपूर विमानतळावर उतरविण्याची परवानगी मागितली.
परवानगी मिळताच त्यांनी विमान तातडीने नागपूर विमानतळावर उतरविले. विमानात 59 प्रवासी व 4 क्रू सदस्य होते. विमानातून अचानक धूर निघू लागल्याने प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली.
नागपूर विमानतळावर विमान उतरताच सुरक्षा कर्मचारी व अग्निशमन जवानांनी प्रवाशांना बाहेर काढले. धुरातून बाहेर निघत प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.