मुंबई आणि हुबळी दरम्यान विशेष ट्रेन

मुंबई आणि हुबळी दरम्यान विशेष ट्रेन

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे मुंबई आणि हुबळी दरम्यान विशेष ट्रेन चालवणार आहे.

कशी असेल विशेष ट्रेनचं वेळापत्रक ?

०७३१८ विशेष दादर येथून दि. १३.३.२०२३ रोजी १३.०५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०५.३० वाजता हुबळी येथे पोहोचेल.

०७३१७ विशेष दि. १२.३.२०२३ रोजी हुबळी येथून १५.३५ वाजता निघेल आणि दादर येथून दुसऱ्या दिवशी ११.३५ वाजता पोहोचेल.

ट्रेन थांबणार कुठे कुठे ?

पनवेल, पुणे, सातारा, मिरज, उगारखुर्द, कुडची, रायबाग, चिकोडी रोड, घटप्रभा, गोकाक, पाचापूर, बेळगावी, देसूर, खानापूर, लोंडा, तावरगट्टी, अलनावर आणि धारवाड.

ट्रेनची संरचना कशी असेल ?

एक द्वितीय वातानुकूलित, एक तृतीय वातानुकूलित, ४ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.

ट्रेनची जागा आरक्षित कशी करायची ?

विशेष ट्रेन क्रमांक ०७३१८ साठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. ११.३.२०२३ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. वरील विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करावे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version