मातृदिनी नयनताराचे खास फोटो

मातृदिनी नयनताराचे खास फोटो

मुंबई, १४ मे २०२३, प्रतीनिधी : दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि विघ्नेश शिवन हे नुकतेच पालक झाले आहेत. दोन्ही स्टार्सनी सरोगसीद्वारे जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यानंतर अभिनेत्री नयनतारा सध्या तिच्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. आता अभिनेत्रीच्या पहिल्या मातृदिनानिमित्त तिचा पती आणि चित्रपट निर्माता विघ्नेश शिवन याने नयनताराचे तिच्या जुळ्या बाळांसोबत कधीही न पाहिलेले काही खास फोटो समाज माध्यमांवर सामायिक केले आहेत.तिच्या या फोटोंनी चाहत्यांची मने जिंकली.


ही छायाचित्रे त्यावेळची आहेत जेव्हा अभिनेत्री नयनताराने रुग्णालयात पहिल्यांदा आपल्या मुलांना मिठी मारली होती. अभिनेत्रीचे हे फोटो इंस्टाग्रामवर येताच व्हायरल झाले.अभिनेत्री नयनताराच्या पतीने तिला मातृदिनानिमित्त खास भेट देताना तिचे हे कधीही न पाहिलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यानंतर या स्टार कपलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version