जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
हार्बर मार्गावर तातडीचा मेगाब्लॉक घेण्यात आलाय. बेलापूर फलाट क्रमांक 2 वर दुरुस्ती काम करण्यात येणार असल्याने हा ब्लॉक घेण्यात आलाय.
मंगळवारी मध्यरात्री 2 वाजता या ब्लॉकला सुरुवात झाली आहे. तातडीनं घेण्यात येणाऱ्या या ब्लॉकदरम्यान 34 लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.
तर, सीएसएमटीला जाणाऱ्या लोकल पनवेलहून सुटणार आहेत. बेलापूर स्थानकातील फलाटाचे काम सुरु असल्यामुळे बेलापूरहून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकल पनवेलहून सुटणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.