नियमित देखभालीच्या कामसाठी मध्य रेल्वे प्रशासनानं रविवार, ०५ फेब्रुवारी २०२३ रोजी मेगाब्लॉक घोषित केला आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर तसंच हार्बर मार्गावर हा ब्लॉक असेल. वडाळा रोड-मानखुर्द अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत मेगा ब्लॉग घोषित करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – वांद्रे/गोरेगाव सेवा सुरच राहतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.०३ ते दुपारी ३.५४ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशी करीता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.४० ते दुपारी ३.२८ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि वांद्रे/गोरेगाव दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार चालतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.३० पर्यंत ट्रान्सहार्बर/मेन लाइनवरून प्रवास करण्याची परवानगी असेल. ब्लॉक कालावधीत पनवेल – मानखुर्द मार्गावर विशेष उपनगरीय गाड्या चालविण्यात येतील. रेल्वे विभागाकडून सांगण्यात आलं आहे की, ब्लॉक कालावधीत पनवेल – मानखुर्द मार्गावर विशेष उपनगरीय गाड्या चालविण्यात येतील. प्रवाशांना होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे. हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत, असं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.