सोनिया गांधी नाराज आमदारांना भेटल्या

सोनिया गांधी नाराज आमदारांना भेटल्या

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस आमदारांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. दरम्यान, काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी या नाराज आमदारांना भेटल्या आहेत. सोनिया गांधी आणि नाराज आमदार यांच्यात दहा मिनिटे गुफतगू झाली. प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षांना दूर ठेवत सोनिया गांधी आणि आमदार यांच्यात चर्चा झाली असून आता महाराष्ट्र काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस आमदार स्वपक्षाच्या मंत्र्यांवर नाराज आहेत. त्यामुळे या नाराज आमदारांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. मविआमधील काँग्रेसचे काही मंत्री नाराज मंत्र्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पत्राद्वारे करण्यात आला आहे. तसेच या आमदारांनी सोनिया गांधी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. त्यानंतर अखेर आज सोनिया गांधी नाराज आमदारांना भेटल्या आहेत. प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षांना दूर ठेवत सोनिया गांधी आणि आमदार यांच्यात दहा मिनिटे चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version