प्रियंकाच्या भन्नाट आइडियाने बदलला सोनालीचा लुक

प्रियंकाच्या भन्नाट आइडियाने बदलला सोनालीचा लुक

कँसरसारख्या गंभीर आजाराशी लढा देणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रेने आपल्या इन्स्टाग्रामवर एक विडियो शेअर केला आहे, यामध्ये सोनालीने पहिल्यांदा आपला नवीन लुक शेअर केला आहे. 

सोनाली बेंद्रे सध्या न्यूयॉर्कमध्ये आपल्या आजारावर इलाज करत आहे. सोनालीने जो वीडियो शेअर केला आहे, त्यामध्ये ती वेगवेगळ्या लुकमध्ये दिसत आहे.
सोनालीने आपल्या या नवीन लुकबद्दल अभिनेत्री प्रियंका चोप्राचे आभार मानले आहेत. 

या वीडियोमध्ये सोनालीने विगचा वापर केला आहे, ज्यामुळे सोनाली सुंदर दिसत आहे.
सोनाली सध्या हायग्रेड कँसरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देत आहे. याच्या ट्रीटमेंमध्ये कीमोथेरेपीमुळे सोनालीला आपले केस कापावे लागले होते.
त्यामुळे आता सोनालीने विगचा वापर सुरु केला आहे, पण सोनालीला विग वापरण्याची ही भन्नाट आइडिया प्रियंका चोप्राने दिली होती. 

त्यामुळे सोनालीने याकरिता प्रियंकाला थँक्यू म्हंटले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version