सोनई तिहोरी हत्याकांड; सहा जण ठरले दोषी

सोनई तिहोरी हत्याकांड; सहा जण ठरले दोषी

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातील सोनई येथे तिहेरी दलीत हत्याकांड घडले होते. या खटल्याची सुनावणी नाशिक येथील जिल्हा न्यायाधीश वैष्णव यांच्या समोर सुरू होती. त्यावर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी अंतिम युक्तिवाद केला. या प्रकरणात 51 साक्षी पुरावे सादर करण्यात आले असून मुलगी फितूर घोषित करण्यात आली. त्यावर आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे. याप्रकरणी 7 पैकी सहाजण दोषी ठरवण्यात आले आहेत. दरम्यान,18 जानेवारीला या शिक्षेची सुनावणी होणार आहे.

जानेवारी 2013 मध्ये सोनई जवळील विठ्ठलवाडी शिवारात संदीप राज धमवार(24), राहुल कंडारे(26), सचिन घारू(23) या तीन मेहतर समाजीतील तरूणांची प्रेम प्रकरणातून क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. मात्र, या प्रकाराला आकस्मात दाखविण्याचा घाच घातला होता. पण, धडावेगळे हातपाय करुन विहिरीत टाकण्याचा प्रताप झाकू कसा शकतो. त्यामुळे घटनेच्या दोन दिवसांनंतर याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकारात अॅड. निकम यांनी 51 साक्षीदारांची उलट तपासणी घेत अंतिम साक्षीदार तपासले. एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे हा ऑनर किलींगचा प्रकार आहे. असे देखील निकम यांनी म्हटले होते.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version