जेजुरीत रंगला सोमवतीचा सोहळा

जेजुरीत रंगला सोमवतीचा सोहळा

महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर सोमवती यात्रा भरली आहे. वर्षभरात गडावर अनेक यात्रा उत्सव होत असतात. सोमवारी अमावस्या आल्यास गडावर सोमवती यात्रा भरते. या दिवशी खंडोबाच्या उत्सव मूर्तींना कऱ्हा नदीमध्ये स्नान घातले जाते. या सोहळ्यामध्ये लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होतात. सोमवार सकाळपासूनच हजारो भाविकांनी दर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी केलीय. सकाळी ११ वाजता उत्सव मूर्तींना कऱ्हा नदीत स्नान घालण्यात आले. सकाळीच पालखी सोहळा कऱ्हा नदीकडे मार्गस्थ झाला. खांदेकरी, मानकरी खांद्यावर पालखी घेऊन जात असतात.

पालखी सोहळ्यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतील. यावेळी भंडारा मोठ्या प्रमाणात उधळला जातो. यळकोट यळकोट जय मल्हार या घोषणांनी गड दुमदुमून गेला आहे. भंडारा अर्थात हळद मोठ्या प्रमाणात उधळल्याने दुरून जेजुरीच्या खंडोबाचा गड पिवळा दिसतो. उन्हात दुरून गड सोन्यासारखा चमकतो. याच कारणामुळे जेजुरी गडाला सोन्याची जेजुरी असेही म्हणतात.

महाराष्ट्रात वापरल्या जाणाऱ्या पंचांगानुसार सोमवारी (20 फेब्रुवारी 2023) ला माघ अमावस्या आहे. माघ अमावस्या या तिथीला द्वापारयुगादी अमावस्या असेही म्हणतात. यंदा माघ अमावस्या सोमवारी येत आहे आणि सोमवारी असणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असेही म्हणतात.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version