‘लायकी नसणारे काही मुख्यमंत्री झालेत’

‘लायकी नसणारे काही मुख्यमंत्री झालेत’

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला 100 टक्के आवडेल, असे विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. त्यावर संजय राऊत यांनी वक्तव्य केले आहे. दोन दिवसांपूर्वी अजित पवार आणि संजय राऊत यांच्यात रंगलेला कलगीतुरा उभ्या महाराष्ट्राने पाहिला. मात्र, अजित पवार खूप गोड माणूस आहेत. ते एक स्वीट डिश आहेत, असे म्हणत कालच संजय राऊत यांनी आपल्यात वाद नसल्याचे सांगितले होते. त्याचाच प्रत्यय आजही आला.

संजय राऊत म्हणाले, “अजित पवारांमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे. सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री असण्याचा त्यांच्या नावे मुख्यमंत्री झाले आहेत. अनेकजण लायकी नसताना मुख्यमंत्री होतात. जुगाड करुन तोडफोड करुन मुख्यमंत्री होत असतात. अजितदादांची इच्छा ही प्रथम व्यक्त झालेली नाही. त्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत.”

पुढे ते म्हणाले, “अजित पवार हे सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री राहिलेले व्यक्ती आहेत. मुख्यमंत्री बनायला कुणाला आवडणार नाही. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्रीपदावर बसण्याचा विक्रम अजित पवारांच्या नावावर आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री पद सांभाळण्याची क्षमता अजित पवारांकडे आहे. ते कित्येक वर्षांपासून राजकारणात आहेत. अनेकवेळा मंत्री राहिलेले आहेत.”अशी प्रतिक्रीया उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. जळगाव दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरेंच्या सभेबद्दल घोषणा करत असताना त्यांनी ही प्रतिक्रीया दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version