सोमालियात भीषण स्फोट; तीनशेहून अधिक नागरिकांचा बळी

सोमालियात भीषण स्फोट; तीनशेहून अधिक नागरिकांचा बळी

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

सोमालियात झालेल्या भीषण बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा तीनशेच्या घरात गेल्याची भीती आहे. रविवारी सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये एका हॉटेलजवळ मोठा बॉम्बस्फोट झालाय. हा स्फोट इतका भीषण होता की घटनास्थळापासून 100 ते 150 मीटरच्या परिघात उपस्थित असलेले नागरिकही मृत्यूमुखी पडलेत.

सोमालियातील अल शबाब नावाच्या दहशतवादी संघटनेनं हा हल्ला घडवून आणल्याची माहिती आहे. या स्फोटात जखमींची संख्याही 300 हून जास्त आहे. ढिगाऱ्यांखालील मृतदेह उपसण्याचं काम सुरु असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची चिन्हं आहेत. जगभरात गेल्या काही वर्षांत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांपैकी हा सर्वात भीषण मानला जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version