‘सोमय्या कुठेही पळून गेलेले नाहीएत’ – चंद्रशेखर बावनकुळे

‘सोमय्या कुठेही पळून गेलेले नाहीएत’ – चंद्रशेखर बावनकुळे

आयएनएस विक्रांत युद्धनौका घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी गैरहजर राहिलेले भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा पुत्र नील सोमय्या देशाबाहेर पळून जाण्याच्या तयारीत आहेत, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सोमय्यांच्या ठावठिकाण्याबद्दल संजय राऊतांकडून आगपाखड असताना, भाजपाने राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे.

भाजप नेते चंद्रशेकर बावनकुळे यांनी यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. किरीट सोमय्या कुठेही पळून गेलेले नाही, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

पोलिसांनी सोमय्या पिता-पुत्रांना विक्रांत युद्धनौका घोटाळ्या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, सोमय्या पिता-पुत्र महाराष्ट्र बाहेर आहे. भाजपाने त्यांना लपवून ठेवले आहे. तसेच त्यांना अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे जामीन मिळेपर्यंत ते दोघेही देशाबाहेर पळून जाण्याच्या तयारीत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. या आरोपांना भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. किरीट सोमय्या कुठेही पळून गेलेले नाहीत, असा दावा बावनकुळे यांनी केला आहे.

सोमय्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

‘विक्रांत वाचवा’ निधीप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ झाली असून विशेष न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. तसेच पुत्र नील सोमय्याच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. तसेच याप्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हा शाखा करणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version