विठ्ठलापुढे नेहमी नतमस्तक होणा-या ‘तेजा’ श्वानाचा मृत्यू

विठ्ठलापुढे नेहमी नतमस्तक होणा-या ‘तेजा’ श्वानाचा मृत्यू

माणूस आणि प्राणी यांच्यातील अतूट नात्यांच्या अनेक गोष्टी एेकल्या आणि बघितल्याही आहेत, अशीच गोष्ट आहे तेजा नावाच्या श्वानाची.

विठ्ठल मंदिरात आल्यावर न चूकता देवासमोर नतमस्तक होणाऱ्या तेजाने काल शेवटचा श्वास घेतला. 

सोलापूर ग्रामीण पोलीस दलात गेली नऊ वर्ष कर्तव्य तत्पर सेवा बजावणाऱ्या बॉम्ब शोधक पथकातील लब्रॉडोर जातीच्या तेजा नावाच्या श्वनाचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यावर शासकीय मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील. अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहीते. पोलीस उपअधीक्षक युनुस आतार. उपनिरीक्षक बारवकर. निरीक्षक दंताळ. बी.डी.डी.एस.पथकाचे उपनिरीक्षक मस्के व इतर अधिकारी उपस्थित होते.

 

कोण होता हा तेजा श्वान?

 

  • सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील लॅब्रॅडोर जातीच्या तेजा नामक श्वानाचा 20 एप्रिल 2009 रोजी जन्म झाला होता.
  • तेजाला पुणे येथे सहा महिन्याचे बॉम्ब शोधण्याचे प्रशिक्षण तर एक महिन्याचे रिफ्रेशर प्रशिक्षण देण्यात आले होते.
  • तेजाने 2015 मध्ये कोल्हापूर परिक्षेत्रीय कर्तव्य मेळाव्यात मेडल तर 2016 मध्ये गोल्ड मेडल व 2017 सिल्वर मेडल मिळवून विशेष कामगिरी केली होती
  • पंढरपूरच्या आषाढी यात्रेमध्ये व्ही.आय.पी. बंदोबस्ताला ती आपले कर्तव्य चोखपणे पार पाडत होता.
  • गेली नऊ वर्ष व्ही.आय.पी बंदोबस्ताला त्याने आपले कर्तव्य चोखपणे पार पाडले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version