वृत्तसंस्था, नवी दिल्ली
तरुणाच्या अंडरवेअरमध्ये जिवंत साप सापडल्याचा धक्कादायक प्रकार जर्मीतील फ्रैंकफर्टच्या डार्म्सटैट शहरात उघडकीस आला आहे. या तरुणाची झडती घेताना पोलिसांचाही थरकाप उडाला. हा साप 35 सेमी इतक्या लांबीचा आहे.
दोघेजण भररस्त्यात हाणामारी करत असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी मारामारी करणाऱ्या 19 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्या पँटमध्य़े काही भाग फुगलेला दिसला. म्हणून पोलिसांनी
त्याची झडती घेतली असता अंडरवेअरमध्ये जिवंत साप सापडला. या तरुणाने अशा प्रकारे साप अंडरवेअरमध्ये का लपवून ठेवला याचा पोलिस तपास घेत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.