सापाच्या विष तस्करीची पहिलीच मोठी घटना रायगडमध्ये घडली आहे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे शेख यांनां खबऱ्या मार्फत मिळालेल्या माहितीवरून अलिबाग येथील माडंवा जेट्टीवर सापाचे विष घेवुन येणाऱ्यांना सापळा रचुन अटक केली आहे.
मुबंईहुन बोटीतुन 2 ईसम सापाचे विष घेऊन अलिबागला येत होते, सापाचे विष बाळगण्याचा परवाना त्यांच्याकडे नव्हता. सापाचे 850 मिली विष या दोघांकडुन ताब्यात घेण्यात आले असुन त्याची किंमत बाजारात 1 कोटी 70 लाख आहे.
यातील आरोपी उदयनाथ जैसवार वय 37 आणि राजाराम जैसवार वय 46, दोघेही नात्याने मामा-भाचे असुन मालाड मुबंई चे रहिवाशी आहेत.
त्यांची चौकशी केली असता त्यांनी हे विष वापी-गुजरात येथुन आणल्याची कबुली दिली.
त्या माहितीवरून गुजराथ येथील 2 साथीदार देवीलाल रामप्रसाद जोशी वय 36 मुळ रा. राजस्थान आणि संतोष कुमार सिगं वय 35 रा. वापी मुळ रा. जौनपुर, उत्तर प्रदेश यांना ही गुजरातहुन अटक केली आहे.
सापाच्या विषाचा मोठा वापर हा औषधे व ड्रग्स बनविण्यासाठी होतो, त्यामुळे या पकडलेल्या विषाचा वापर नक्की कुठे होणार होता, याची मागणी कोणी केली याचा तपास सध्या सुरु आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.