मोबाईलमुळे ते समुद्रात बुडता बुडता वाचले

मोबाईलमुळे ते समुद्रात बुडता बुडता वाचले

जय महाराष्ट्र न्यूज, मालवण

मालवणच्या समुद्रात बुडालेल्या बोटीतील पाचही मच्छिमारांना सुखरुप किनाऱ्यावर आणण्यात यश मिळाले. यावेळी समुद्रात बुडणाऱ्या मच्छिमारांना मोबाईलनं तारल्याचं समजते. समुद्रात बुडालेल्या अवस्थेत बोटीचा आधार घेत एका मच्छीमारांना किनाऱ्यावरील मच्छिमार बांधवाना मदतीसाठी फोन केला.

 

तर, किनाऱ्यावरील मच्छिमारांनी त्वरीत 4 ते 5 बोटींच्या मदतीनं समुद्रात धाव घेतली. किल्ले सिंधुदुर्गच्या खोल भागात असलेल्या पाचही मच्छीमारांना मदतीसाठी आलेल्या मच्छिमार बांधवांनी सुखरूप किनाऱ्यावर आणले. यावेळी मोठी जीवितहानी टळली असून नौका, जाळी आणि इंजिनचं काही प्रमाणात नुकसान झाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version