टेकड्यांलगतच्या शंभर फूट परिसरातल्या बांधकामाला बंदी; पुण्यातील हजारो कुटुंबियांचा प्रश्न ऐरणीवर

टेकड्यांलगतच्या शंभर फूट परिसरातल्या बांधकामाला बंदी; पुण्यातील हजारो कुटुंबियांचा प्रश्न ऐरणीवर

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

राज्यातल्या टेकडय़ांलगतच्या शंभर फूट परिसरात बांधकाम करण्यास बंदी घालणारा आदेश नगरविकास विभागाने काढलाय.

या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व महानगरपालिका, नगरपलिका, नियोजन प्राधिकरण यांना देण्यात आल्या आहेत.

पुणे जिल्ह्य़ातल्या कात्रज घाटातल्या टेकडय़ा फोडून करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांबाबतचे प्रकरण राष्ट्रीय हरित लवादाकडे दाखल करण्यात आलं होतं.

दरम्यान, टेकडी परिसरात राहणाऱ्या कुटुंबाना या निर्णयाचा फटका बसणार असल्याचं चित्र दिसतंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version