राज्यातील झोपडपट्टीधारकांसाठी मोठी गूड न्यूज

राज्यातील झोपडपट्टीधारकांसाठी मोठी गूड न्यूज

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यातील झोपडपट्टीधारकांसाठी एक खुशखबर आहे. दोन हजार सालानंतरच्या झोपडपट्टीधारकाला आता वाजवी दरात फ्लॅट मिळणार आहे.

यासाठी महाराष्ट्र झोपडपट्टी कायदा, 1971मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. यानुसार पात्र झोपडपट्टीधारकाला प्रधानमंत्री आवास योजनेअंतगर्त हा लाभ मिळू शकतो.

सर्वांना घरे ही संकल्पना झोपडपट्टी पुनर्वसन कार्यक्रमाअंतगर्त राबविण्याचाही सरकारचा विचार आहे. गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या गृहनिर्माण विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या घरांच्या किमती निश्चित करण्यात येत असल्याचं गृहनिर्माण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. काही सवलती रेडी रेकनर (आरआर) दरामध्ये देण्यात येईल किंवा झोपडपट्टीधारकाला बांधकामाचा खर्च सोसावा लागेल, असंही या अधिकाऱ्यानं सांगितलं.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version