देशात कोरोना रुग्ण संख्येत किंचित वाढ

देशात कोरोना रुग्ण संख्येत किंचित वाढ

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचीत वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशभरात नव्या १ हजार ९३८ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोनामुळे ६७ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

दरम्यान, काल देशभरात १ हजार ७७८ कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर ६२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत ४ कोटी ३० लाख १४ हजार ६८७ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

दुसरीकडे, कोरोना नियमांबाबत केंद्र सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. देशात लवकरच कोरोना नियममुक्ती मिळणार असून निवडक कोरोना प्रतिबंध ३१ मार्चपासून हटविण्यात येणार आहेत. मात्र, मास्क वापर आणि सामाजिक अंतराची अट पाळणे अनिवार्य असणार असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version