थंडीतही राहा तजेलदार; अशी घ्या त्वचेची काळजी

थंडीतही राहा तजेलदार; अशी घ्या त्वचेची काळजी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

हिवाळा आला की महिलांना चिंता सतावते ती त्यांच्या चेहऱ्याची. कारण थंडीचा सर्वाधिक परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. थंडीमुळे आपली त्वचा एकदम शुष्क होते. त्वचेची नमी कायम राखण्यासाठी पुरेसे पाणी प्यावे. त्वचेसाठी एखादे माँईश्र्चराईजर वापरावे. महिन्यातून एकदा फेशिअल केले पाहिजे. ग्लिसरीन व कोल्ड क्रिम वापरल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.

चेहरा धुतल्यानंतर टोनर किंवा कोल्ड क्रिम वापरावे. मगच घराबाहेर पडावे. तसेच, थंडीचा आपल्या केसांवर देखील परिणाम होतो. त्यामुळे केस जास्त तेलकट होऊ देऊ नये. वेळ मिळेल तसे केस धुवावेत. थंडीत तुम्ही स्वत:ची जितकी काळजी घ्याल तुमची त्वचा तितकीच बहरुन निघते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version