Siya Goyal Viral Photo Controversy : ‘ते अश्लील हावभाव नव्हतेच’, सियाच्या वडिलांचा मोठा दावा; म्हणाले गाडीच्या दरवाज्यात..

मीडियाच्या कॅमेऱ्याकडे पाहत सियाने अश्लील हावभाव केल्यावरून जोरदार टीका होत असताना याबाबत तिच्या वडिलांनी एक वेगळाच दावा केला आहे.
Siya Goyal Viral Photo Controversy : ‘ते अश्लील हावभाव नव्हतेच’, सियाच्या वडिलांचा मोठा दावा; म्हणाले गाडीच्या दरवाज्यात..

Siya Goyal Viral Photo Controversy : पुण्यातील बहुचर्चित आणि धक्कादायक केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये पोलीस बंदोबस्तात जात असताना सियाने मीडियाच्या कॅमेऱ्यांकडे पाहून 'मिडल फिंगर' (अश्लील हावभाव) दाखवल्याचा आरोप नेटकऱ्यांकडून केला जात होता. यावरून सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच, आता सियाचे वडील प्रवीण गोयल यांनी समोर येत या संपूर्ण प्रकरणावर मोठा खुलासा केला आहे आणि व्हायरल फोटोमागचे वास्तव वेगळेच असल्याचे सांगितले आहे.

पोलिसांच्या गाडीच्या दरवाज्यात बोटं सापडल्याने सूज
सियाचे वडील प्रवीण गोयल यांनी सोशल मीडियावरील सर्व दावे पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, ज्या दिवशी पोलीस तपासासाठी आणि पडताळणीसाठी सियाला घरी घेऊन आले होते, त्या वेळी पोलिसांच्या कारचा दरवाजा लावताना सियाची 2 बोटं घाईगडबडीत दरवाज्यात दाबली गेली. या अपघातामुळे तिच्या बोटांना मोठी सूज आली होती आणि नखेही निळी पडली होती. असह्य वेदनेमुळे तिच्या हाताची जी विशिष्ट स्थिती झाली, तीच नेमकी कॅमेऱ्यात कैद झाली आणि लोकांनी त्याचा चुकीचा अर्थ काढला. ही घटना घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसमोरच घडली असल्याने कोणाचा विश्वास नसेल तर त्यांनी पोलिसांकडे चौकशी करावी, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – Ratnagiri: हृदय पिळवटून टाकणारी घटना! दीड वर्षांच्या मुलासह धावत्या मांडवी एक्सप्रेसमधून जोडप्याची उडी; महिलेचा जागीच मृत्यू

स्नॅपचॅटवरील 'ते' संभाषण पोलिसांच्या हाती
लोहगड किल्ल्यावर झालेल्या या हत्येच्या तपासात दररोज नवनवीन आणि थरारक खुलासे होत आहेत. दोन्ही आरोपी गेल्या दीड महिन्यांपासून हत्येचा कट रचत होते आणि कोड वर्ड वापरत होते, असा संशय पोलिसांना आहे. अशातच आता सियाचे तिच्या एका मैत्रिणीसोबतचे स्नॅपचॅटवरील चॅट सोशल मीडियावर लीक झाले आहे, ज्यामध्ये 'तसंही आता लग्न तर होणार नाहीये…' अशी ओळ लिहिलेली पाहायला मिळत आहे. 25 मे रोजी झालेल्या या संशयास्पद संभाषणाने आता तपासाची चक्रे पूर्णपणे फिरवली असून पोलीस या डिजिटल पुराव्याची कसून पडताळणी करत आहेत.

दोन्ही आरोपींची थेट न्यायालयीन कोठडीत रवानगी
दरम्यान, वडगाव सत्र न्यायालयात या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना तिसऱ्यांदा हजर करण्यात आले होते. पोलिसांनी अधिक तपासासाठी कोठडी वाढवून मागितली होती, परंतु न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपींची 16 जुलै 2026 पर्यंत न्यायालयीन कोठडीत (ज्युडिशियल कस्टडी) रवानगी केली आहे. या धक्कादायक हत्या प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून पोलीस नार्को आणि इतर चाचण्यांच्या पर्यायांवरही विचार करत आहेत.

हेही वाचा – Crime News: पत्नीच्या कृत्याने देश हादरला; नवऱ्याला संपवलं आणि मृतदेह बाथरुममध्ये पुरला, शोधण्याचं केलं नाटक पण…

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version