‘मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या पाच मागण्या पूर्ण कराव्यात’

‘मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या पाच मागण्या पूर्ण कराव्यात’

सिंधुदुर्ग: खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सिंधुदुर्ग दौरा केला असून त्यांनी तौक्ते चक्रीवादळात सिंधुदुर्ग किल्यावर झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर संभाजीराजे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

‘मराठा आरक्षणावर ५ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला तेव्हा आम्ही समंजसपणाची भूमिका घेतली होती. मराठा समाजाला संयम राखण्याचा सल्ला मी दिला होता. त्यामुळं त्यावेळी राज्यात उद्रेक झाला नाही. मुख्यमंत्र्यांनी माझ्या त्या भूमिकेचं कौतुक केलं होतं. आता त्यांनी मला कोविड योद्धे म्हणून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. पण मी पूर्वीपासूनच समाजाचा योद्धा आहे, समाजासाठी लढत आलो आहे. कोविड योद्धा म्हणून मी बाहेर पडावं असं मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर त्यांनी मराठा समाजाच्या पाच मागण्या मान्य कराव्या’, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

‘येत्या ६ जून रोजी मी माझी पुढील भूमिका स्पष्ट करणार आहे. त्याआधी त्यांनी निर्णय घ्यावा. राजकारण बाजूला ठेवून सरकारनं मराठा समाजाला न्याय द्यावा,’ असं संभाजीराजे म्हणाले.सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्याची तारीख ४ जून आहे. सर्वोच्च न्यायालयानं ती आणखी वाढवली आहे. त्यामुळं अहवाल द्यायची तारीख सुद्धा पुढं गेली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मार्ग काढू असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीरपणे सांगितलं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नक्कीच यातून मार्ग काढतील’, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version