सिंधुदुर्गमधील आंबोली धबधबा वादाच्या भोवऱ्यात

सिंधुदुर्गमधील आंबोली धबधबा वादाच्या भोवऱ्यात

जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाचा मानबिंदू असलेल्या आंबोली धबधब्याचं नाव बदलावरून वाद सुरु झाला आहे.

 

धबधब्यावर आकारल्या जाणाऱ्या पर्यटन करात  मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे पारपोली आणि आंबोली गावात चढाओढ सुरू झाली आहे.

 

आंबोली धबधबा पारपोली गावाच्या हद्दीत येत असल्यामुळे याचे नाव बदलून “शिवतीर्थ धबधबा पारपोली” करावं, अशी मागणी पारपोलीतील गावकरी करत आहेत.

 

तर, नाव बदलून काहीही निष्पन्न होणार नाही, असं आंबोली गावकऱ्यांनी म्हटले. दरम्यान धबधब्याचे नाव बदलण्याबाबत कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव वनविभागाला मिळालेला नाही असा प्रस्ताव आल्यास शासनाकडे पाठवण्यात येईल असे वनविभाग अधिकारी म्हणत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version