राष्ट्रवादीचा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन

राष्ट्रवादीचा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन

दिल्ली , १० जून २०२३, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा १० जून २०२३ शनिवारी २५ वा वर्धापन दिन आहे. पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत दिल्लीत कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात शनिवारी दुपारी १२ वाजता वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.

या वर्धानपण दीना निमित्त कार्यक्रमाला खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रीय कार्यकारिणीतील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रौप्यमहोत्सवी वर्षांत पदार्पण करताना पक्षाच्या वतीने शुक्रवारी नगरमध्ये मोठा मेळावा आयोजित केला होता. पण वेधशाळेने वादळी पावसाचा अंदाज वर्तविल्याने ही सभा लांबणीवर टाकण्यात आली. वर्धापन दिनानिमित्त मुंबईत पक्षाच्या मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version