यंदा पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे अनेक जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न मिटला आहे. पावसांच्या जोरदार सरींमुळे हिंगोली धरण पाणलोट क्षेत्रातील पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.
हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा मुबलक प्रमाणात झाला आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेत यावर्षी चार फुटांनी पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील पाणीपुरवठा करणारे महत्त्वाचे तीनही धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे शेतीसाठी पुरवठा करणाऱ्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागला आहे. हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वरी, येलदरी आणि इसापूर या तीनही धरणांमध्ये तुडूंब पाणीसाठी असल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.