#IndiaStrikesBack सिद्धूंनी केले भारतीय हवाई दलाचे कौतुक

#IndiaStrikesBack सिद्धूंनी केले भारतीय हवाई दलाचे कौतुक

१४ फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळांवर हल्ला केला. पुलवामा हल्ला झाल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे सिद्धू यांना ‘द कपिल शर्मा शो’ मधून हकलपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना गोरेगाव येथील फिल्मसिटीतही बंदी घालण्यात आली होती. मात्र हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात सिद्धू यांनी चक्क कौतुक केले आहे. सिद्धू यांनी ट्विट करत हवाई दलाचे कौतुक केले आहे.

सिद्धू यांनी ट्विटमध्ये काय म्हटलं ?

सिद्धू यांनी भारतीय हवाई दलाचे कौतुक केले.

तसेच ‘लोहा लोहे को काटता है, आग आग को काटती है, सांप जब डंक मारता है, उसका एंटीडोट विष ही है.

भारतीय वायूसेना की जय हो. जय हिंद जय हिंद की सेना’  असे ट्विटमध्ये म्हटलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version