अभिनेत्री श्वेता साळवे बोल्ड फोटोमुळे झाली ट्रोल

अभिनेत्री श्वेता साळवे बोल्ड फोटोमुळे झाली ट्रोल

सोशल मीडियावर सेलिब्रेटी कोणत्या ना कोणत्या कारणावरून ट्रोल होतच असतात.

यावेळी अभिनेत्री, मॉडेल, डान्सर असलेल्या श्वेता साळवे ही आपल्या बोल्ड फोटोमुळे ट्रोल झाली आहे. तिने इंस्टाग्रामवर बिकिनीमधील काही फोटो शेअर केले होते, त्यावर सोशल मीडिया युजर्सने ट्रोल करण्यास सुरवात केली.

श्वेता साळवे हिने बोल्ड अंदाजात मद्य आणि धुम्रपान करतानाचे फोटो इंस्टाग्रामवर युजर्सनी पाहिले आणि ‘ती तिच्या मुलीसाठी एक वाईट आई असल्याचं हे उदाहरण आहे,’ असे कमेंट्स देण्यात आले.

यावर तिने त्याला खरमरीत प्रत्यूत्तर करताना प्रश्नच विचारला आहे. ‘हो मी मद्य आणि धुम्रपान करते. परंतु त्यामुळे मी काही वाईट आई असल्याचे सिद्ध होत नाही. तसेच तिने लोकांना विचारले आहे की, तुम्ही कधी माझ आयुष्य विस्कळीत झालेल पाहिल आहे का, तुम्ही कधी बेरोजगार पाहिले आहे का, मी एक अभिनेत्री आहे, डान्सर आहे, मल्टीटास्कींग आई आहे. माझे खूप मित्र-मैत्रिणी आहेत. ते सर्वजण मला जीव लावतात. जेव्हा महिला आपल्या मुलांचं पालन-पोषण करण्यासाठी देहविक्री करतात, तेव्हा त्या काही वाईट आई होत नाहीत.’ असं तिने बोल्ड उत्तर लिहिलं दिले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version