…म्हणून मी शिष्यवृत्ती मागे घेत आहे – श्रृती बडोले

…म्हणून मी शिष्यवृत्ती मागे घेत आहे – श्रृती बडोले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

माझ्यात गुणवत्ता आहे आणि माझे वडील मंत्री आहेत यात माझा दोष काय? असा सवाल सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची मुलगी श्रुती बडोले यांनी केला आहे.

 

माझे वडील मंत्री नसतानाही मला माझ्या गुणवत्तेच्या आधारावरच विद्यापाठीने शिष्यवृत्ती दिली होती. आता माझ्या गुणवत्तेच्या आधारावरच मी राज्यसरकारकडे शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

पीएचडी इन सायन्स या अभ्यासक्रमासाठी राज्य सरकारच्या शिष्यवृत्ती करिता तीन जागा आहेत. या तीन जगांसाठी केवळ दोन अर्ज आलेत. त्यात एक जागा अजूनही रिक्त आहे, मी मंत्र्यांची मुलगी म्हणून कोणाचाही हक्क कधी डावलला नाही आणि कधी डावलणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.  

 

वडील मंत्री आहेत म्हणून शिष्यवृत्तीवर वाद होत असेल आणि यामुळे माझी गुणवत्ता झाकोळली जाणार असेलतर मी शिष्यवृत्ती नाकारत असल्याचे श्रृती बडोले यांनी सोशल मिडियावरुन सांगितले आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version