शिवजयंतीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपाच्या उपमहापौरांच्या राजीनाम्याबाबत धक्कादायक माहिती उघड

शिवजयंतीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपाच्या उपमहापौरांच्या राजीनाम्याबाबत धक्कादायक माहिती उघड

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

 

अहमदनगर महापालीकेचे भाजपाचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी शिवजयंतीसंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानांनंतर त्यांच्या विरोधातील रोष अधिकाधिक वाढतांना दिसतोय. त्याचं हे अश्लाघ्य वक्तव्य म्हणजे बीजेपीच्या दिवाळखोरीचं लक्षण असल्याची टिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शिर्डीत केलीये.

दुसरीकडे कोल्हापूरात शिवसेनेनं छिंदम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चप्पलानं मारत त्याचं दहन केलं. शिवाजी चौकात आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. शिवसेनेसोबतच हिंदुत्ववादी संघटना आणि शिवप्रेमींनींही या घटनेचा निषेध करत छिंदमांच्या विरोधात रॅलीही काढली.

तर, भाजपानं छिंदम यांचा राजिनामा घेतल्याचं जाहिर केलं असलं तरी ती केवळ नौटंकी असल्याची टिका होतांना दिसतीये. कारण तो राजीनामा महापौर कार्यालयाकडे पाठवणं आवश्यक असतं परंतु प्रत्यक्षात हा राजिनामा अद्याप पक्षाकडेच असल्याचं स्पष्ट झालय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version