साई चरणी घोटाळा; भक्तांचा आकडा आणि प्रसाद पाकीट वितरणात तफावत

साई चरणी घोटाळा; भक्तांचा आकडा आणि प्रसाद पाकीट वितरणात तफावत

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून  2017 च्या डिसेंबर महिन्यात 13 लाख 42 हजार 194 भक्तांनी बायोमेट्रीक पास काढून दर्शन घेतले आहे. या भक्तांना साई संस्थान बुंदी पाकीट प्रसाद म्हणून देते.

या महिन्यात दर्शन घेणाऱ्या भक्तांचा आकडा आणि प्रसाद पाकीट वितरीत करणाऱ्या  पाकीटांच्या संखेत तब्बल 5 लाख पाकीटे जास्त दिली गेल्याचं माहिती अधिकारातच उघड झाले आहे.

ही पाकीटे कुठे गेली याच्या चौकशीची मागणी माहीती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version