सध्या सर्वत्र पगारवाढीच्या चर्चा सुरू आहेत. खासगी क्षेत्रातील प्रत्येक कर्मचारी मार्च-एप्रिल महिन्यात अप्रेजलची वाट बघत असतो. मात्र आता याबद्दलच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एका बहुराष्ट्रिय कंपनीमध्ये पगारवाढीच्या नावाखाली थट्ट्ा केल्याची घटना घडली आहे.
एका नामांकित आयटी कंपनीत काम करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या वर्षभराच्या मेहनतीचं फळ फक्त ९ रुपये मिळालं आहे. पगारवाढीच्या नावाखाली झालेली ही क्रूर थट्टा केली आहे, एका तरुणाची व्यथा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या तरूणामुळे कॉर्पोरेट जगतातील धक्कादायक वास्तव समोर आलंय.
या पगारवाढीमुळे इंजिनिअरने नाराजी व्यक्त केली. इंजिनिअरच्या पोस्टमुळे चर्चा सुरू झाली आहे. नेटकऱ्यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला. संबंधित इंजिनिअरने पोस्टमध्ये म्हटले आहे की, वर्षाच्या शेवटी मिळालेली पगारवाढ पाहून धक्काच बसला. कंपनीने त्याच्या पगारात महिन्याला फक्त 9 रुपयांची वाढ केली. ही वाढ म्हणजे त्याच्या कामाचा अपमान असल्याची भावना त्याने व्यक्त केली आहे. "एवढ्या पगारात मी काय करणार? साधी चहाची तल्लफही यात भागणार नाही," अशा शब्दांत नेटकऱ्यांनी यावर संताप व्यक्त केला आहे.
फक्त कमी पगारवाढ झाला म्हणून इंजिनिअर वैतागला नाही. तर कंपनीचा 'नोटीस पिरियड' हा त्याच्यासाठी मोठा अडथळा ठरत आहे. या इंजिनिअरला ही कंपनी सोडून दुसरीकडे जायचे आहे. पण कंपनीचा नोटीस पिरियड 90 दिवसांचा आहे. 3 महिने थांबायला कोणीच तयार नसल्यामुळे त्याला दुसरीकडे चांगली नोकरी मिळवणे कठीण झाले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.