त्र्यंबकेश्वराच्या पिंडीवर चादर चढवण्याचा प्रयत्न

त्र्यंबकेश्वराच्या पिंडीवर चादर चढवण्याचा प्रयत्न

त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात धक्कादायक प्रकार घडला आहे. उरुसादरम्यान इतर धर्मियांकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्र्यंबकेश्वराच्या पिंडीवर इतर धर्मियांकडून चादर चढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले. पोलिसांच्या आणि मंदीर प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला.

राज्यात अनेक भागांत तणावग्रस्त परिस्थिती असताना त्र्यंबकेश्वरमध्येदेखील धक्कादायक प्रकार घडला आहे. इतर धर्मियांकडून त्र्यंबकेश्वराच्या पिंडीवर चादर चढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, मंदीर प्रशासन आणि पोलिसांनी मुसलमानांना रोखले. आणि परिस्थिती निवळली. १३ मे रोजी ही घटना घडली असून जमावावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिसांना पत्र देण्यात आलं आहे.

दरम्यान, या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी ब्राम्हण महासंघाने केली आहे. तसेच, कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ब्राम्हण महासंघाने दिला आहे. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version